पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाचा मदतीचा हात

जळगाव : महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद तसेच जळगाव जिल्हा तलाठी संघ यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑनलाईन जमा करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.

या उपक्रमातून संकटाच्या काळात प्रशासन व नागरिक यांचे परस्पर सहकार्य हेच खरी ताकद असल्याचा संदेश दिला गेला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत जमा झालेली रक्कम थेट पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहोचणार आहे.

नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑनलाईन योगदानासाठी अधिकृत संकेतस्थळ cmrf.maharashtra.gov.in वर थेट पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे.

“आपला छोटासा खारीचा वाटाही मोठा आधार ठरू शकतो. चला, आपण सर्वजण मिळून पूरग्रस्त बांधवांना मदत करूया,” असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours