रावेर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जामनेर (प्रतिनिधी):
रावेर तालुक्यातील विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जामनेर येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि राज्याचे लोकप्रिय नेते गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

या सोहळ्यात राजेंद्र चौधरी, कृ.उ.बा. संचालक जयेश कुयटे, गणेश महाजन, रोहित अग्रावाल, राजू सुवर्णे, मुरलीधर महाजन (वाघाडी), प्रकाश पाटील (निंभोरा) यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

प्रवेश सोहळ्याला आमदार अमोलदादा जावळे, भाजप लोकसभा प्रमुख नंदू महाजन, प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष दुर्गादास पाटील, सूर्यकांत देशमुख यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रवेशामुळे भाजपला रावेर तालुक्यात अधिक बळ मिळणार असून स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours