जामनेर प्रतिनिधी (मोहन दुबे) :
जामनेर-बोदवद रस्त्यावरील भवानी माता मंदिराजवळ आज भीषण अपघात झाला. दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे.
मयताची ओळख सोनू भील अशी झाली असून, त्यांची मुलगी दिव्या भील हिला गंभीर जखमी अवस्थेत तात्काळ जळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोनू भील आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह भवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून घरी परत जात हा अपघात घडला. दोन दुचाकींची जोरदार समोरासमोर धडक झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या अपघातात सोनू भिल याचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. तर मुलगी दिव्या भील ही गंभीर जखमी झाली असून अजून एक व्यक्ती कंपनी झाली आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
+ There are no comments
Add yours