भाजपाची उत्तर महाराष्ट्र निवडणूक तयारी सुरू — नाशिक येथे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न

नाशिक | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत “भाजपा – उत्तर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक” उत्साहात पार पडली. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, पक्षाची संघटनात्मक रचना, तसेच आगामी निवडणुकांसाठीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद वाढविणे, मतदारसंघनिहाय नियोजन आणि संघटन बळकटीसाठी विशेष भर द्यावा, असे मार्गदर्शन केले. एकजुटीच्या माध्यमातून यश संपादन करण्यासाठी पक्षातील सर्व पातळ्यांवरील समन्वयाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या बैठकीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल, संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

जळगाव शहरातून जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उज्वलाताई बेंडाळे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, राजेंद्र घुगे, अॅड. शुचिता हाडा, नीतीताई परदेशी, दीपमालाताई काळे आदींनी सहभाग घेतला.

या बैठकीत झालेला विचारविनिमय आणि रणनीती उत्तर महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाचा मार्ग निश्चित करणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours