पुणे : रेव्ह पार्टीवर छापा एकनाथ खडसेंच्या जावयासह अन्य तीन जणांना घेतले ताब्यात! 

पुणे शहराच्या खराडी परिसरात पोलिसांनी एका हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केला असून, 2 महिला आणि

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती.
खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती.

रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.

यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकनाथ खडसे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्षा यांचा नवरा प्रांजल खेवलकर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या.
या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहेप्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे.
रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत. त्यामुळे त्यांनी यावर सध्या बोलायला नकार दिला आहे.
तर एकनाथ खडसे यांनी देखील अद्याप या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

खराडीतील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईची योजना आखली. रात्री उशिरा पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी तिथे मोठ्या आवाजात संगीत सुरू होते आणि उपस्थित लोक अमली पदार्थांचे सेवन करत होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पार्टीतील सर्व लोकांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांचा स्रोत आणि ते पुरवणारे रॅकेट शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणे शहरात अमली पदार्थांचा वापर वाढत असल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये राजकीय नेत्याच्या पतीचा समावेश असल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. 

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours