जामनेरमध्ये समाजवादी पक्षाची कार्यकारिणी बैठक — युवकांचा पक्षप्रवेश

जामनेर  — समाजवादी पार्टी, जामनेर यांच्या वतीने आज आयोजित बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा तसेच प्रदेशस्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीला गुडडू भाई काकर (निरीक्षक, जळगाव महानगर अध्यक्ष धुळे), रईस बागवान (प्रदेश सचिव), अफजल खान (कोर कमिटी सदस्य), रिजवान जागीरदार (महानगर अध्यक्ष जळगाव), हुसैन बावारईस कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी रऊफ शेख यांची तालुका अध्यक्षपदी, रफीक शाहफिरोज बेग यांची तालुका उपाध्यक्षपदी, तर जहर खान यांची सचिवपदी निवड करण्यात आली. तसेच शे. साबीर सरचिटणीस, शे. रईस खजिनदार, शे. अफसर सहसचिव, शहाबुद्दीन मिस्त्री सहसंघटक अशा कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली.

बैठकीदरम्यान समाजवादी पक्षात युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला. लुकमान भाई, तैयब शेख, मोहम्मद खिजर, राजीक शेख, मोहम्मद अमन, मोहम्मद अनस, मोहम्मद रेहान, शे. रईस, फारुक शेख, शरीफ बेग, अनीस शेख, रईस शेख, जाकीर मिस्त्री यांच्यासह शेकडो युवकांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

या युवकांच्या प्रवेशामुळे जामनेर तालुक्यात समाजवादी पक्षाची ताकद वाढली असून, आगामी काळात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours