जामनेर: अवैध पद्धतीने वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची आयशरला जोरदार धडक

दिवसा वाळू वाहतूक तरी जामनेर महसूल प्रशासन गाढ झोपेत

एरंडोल जामनेर मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर ने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका आयशर टेंपो ला समोरून जोरदार धडक दिली आहे.
सुदैवाने आयशर चालक लघुशंकेसाठी खाली उतरलेला होता, तितक्यात भरधाव वेगात डंपर ची धडक बसली. या घटनेत डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे. डंपर वर कोणताही नंबर नसून दिवसा अवैध पद्धतीने वाळू  वाहतूक केली जात असल्याने जामनेर महसूल प्रशासन गाढ झोपेत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. ही घटना आज शनिवार दिनांक 7 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे, घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले मात्र जामनेर महसूल विभागाने मात्र तत्परता दाखवली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार , निधी एरंडोल रस्त्यावर आज सकाळी आयशर टेंपो हा नेरी मार्गे एरंडोल कडे जात होता, त्याच रस्त्यावरून अवैध वाळू तस्करी करणारा विना नंबरचा डंपर एरंडोल कडून जामनेरकडे भरधाव वेगात येत होता. आयशर टेंपो चालक सुदैवाने आपले वाहन थांबवून लघुशंकेसाठी खाली उतरला, त्याने आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावली होती. मात्र भरधाव वेगात असणाऱ्या डंपर चलकाचे नियंत्रण सुटले आणि थेट उभ्या असलेल्या आयशर टेंपो ल धडक दिली.
सुदैवाने टेंपो चालक थोडक्यात बाचावला, मात्र डंपर चालक या घटनेत जखमी झाला आहे. घटनेची माहिती स्थानिकांनी जामनेर पोलिसांना दिली. सोबतच पत्रकार सागर लव्हाळे यांनी ही माहिती जिल्हाधिकारी , आणि जामनेर तहसीलदार यांना दिली , मात्र घटनेच्या तासांभारनंतर देखील महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले नाही. डंपर चालकाला जळगावच्या सरकारी रुग्णालयात नेले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याचबरोबर आयशर चालक लघुशंकेसाठी खाली उतरल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे.

दिवसा अवैध वाळू वाहतूक:
जामनेर तहसील अंतर्गत गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध पद्धतीने वाळूची सर्रास वाहतूक सुरू आहे. अनेकदा तक्रारी करून देखील अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरत आहे. भरधाव वेगात जाणारे हे विना नंबर चे डंपर एखाद्याचा जिव घेतल्यानंतरच महसूल प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

जिल्हाधिकारी वाळू वाहतुकीवर लक्ष घालणार का ?

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अनेकदा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यानविरोधात मोहीम झेडली होती. मात्र ही  कारवाईची मोहीम पुन्हा एकदा जामनेर तालुक्यात घेणे गरजेचे झाले आहे. जामेनर तालुक्यात सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक , अवैध पद्धतीने उत्खनन असे सर्व गैर प्रकार सुरू असतांना मात्र तहसीलदार आपली पाठ थोपटून घेतात कसे असा प्रश्न निर्माण होत आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours