‘विश्व शाकाहार दिन’निमित्त जामनेरमध्ये ‘फन अँड फूड फेअर’ — जैन समाजाचा उत्स्फूर्त सहभाग

जामनेर  – भारतीय जैन संघटना जामनेर शाखा आणि श्री जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालय, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विश्व शाकाहार दिवस’ निमित्त एक आगळावेगळा ‘फन अँड फूड फेअर’ कार्यक्रम बुधवारी उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचा उद्देश ‘जैन ते जैन व्यापार वृद्धी’ आणि शाकाहाराचा प्रसार असा होता. एकूण २२ स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यात फूड स्टॉल, गेम स्टॉल, तसेच गृहउपयोगी वस्तूंच्या विक्री स्टॉल्स यांचा समावेश होता. सर्व स्टॉल्सवरील खाद्यपदार्थ पूर्णतः जैन पद्धतीचे होते. शहरातील जैन समाजबांधव आणि नागरिकांकडून या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेशचंद धारिवाल (सचिव, ओसवाल वाचनालय), प्रविण बोहरा, सुमित मुनोत, विकास कोठारी, कुशल बोहरा, संकल्प लोढा, दर्शन बागमार, हर्षल बोहरा, रितेश कोठारी, तसेच महिला विंगच्या सौ. सोनल कोठारी, सौ. संगीता मंडलेचा, सौ. राखी लोढा, सौ. मनीषा कोठारी, सौ. वंदना चोरडिया आणि सौ. स्नेहल मुनोत यांच्या उपस्थितीत झाले.

कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड डॉ. दीपक कोठारी, आदित्य मंडलेचा, सौ. मोना चोरडियासौ. रुपाली बोहरा यांनी जबाबदारीपूर्वक आयोजन केले.
स्पर्धांमध्ये सौ. दिपाली चोरडिया (फूड स्टॉल), कर्णावट (विक्री स्टॉल), आणि मित लुंकड व राहत जैन (गेम स्टॉल) यांनी विजेतेपद मिळवले. सर्व विजेत्यांना वाचनालयामार्फत उपहार देऊन सन्मानित करण्यात आले.

या उपक्रमामुळे जामनेरमध्ये शाकाहार, आरोग्य आणि एकतेचा सुंदर संदेश पसरवला गेला.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours