आचारसंहितेचे पालन सुनिश्चित — नवराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

जामनेर (प्रतिनिधी) – नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना, जामनेर येथील सोनबर्डी परिसरात लावलेल्या विकासकामाच्या उद्घाटन फलकांवर पडदा टाकण्यास प्रशासन विसरले होते. या प्रकाराकडे नवराष्ट्र टाइम्सने लक्ष वेधताच प्रशासनाने तात्काळ कारवाई केली.

प्रांत अधिकारी विनय गोस्वामी यांना संबंधित माहिती मिळताच त्यांनी त्वरीत अधिकाऱ्यांना सूचित केले आणि काही तासांतच आचारसंहितेच्या नियमानुसार सर्व फलकांवर पडदा टाकण्यात आला.

स्थानिक नागरिकांनीही नवराष्ट्र टाइम्सच्या तत्पर वृत्तांकनाचे स्वागत करत, “माध्यमांच्या जागरूकतेमुळे प्रशासन सतर्क झाले,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

निवडणुकीदरम्यान अशा उल्लंघनाच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, पुढील काळात कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये यासाठी विशेष पथके तयार करण्यात येणार असल्याचे समजते.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours