जामनेर:  प्रभाग 12-अ मधून अरविंद शांताराम तायडे यांची उमेदवारी दाखल

जामनेर नगरपरिषद निवडणूक : अजित पवार गटाकडून अरविंद शांताराम तायडे यांची उमेदवारी दाखल

जामनेर – आगामी नगरपरिषद निवडणुकीत राजकीय रंगत वाढत असताना प्रभाग क्रमांक 12-अ मधून अजित पवार गटाकडून अरविंद शांताराम तायडे यांनी आज अधिकृतरीत्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उत्साही उपस्थिती पाहायला मिळाली.

अरविंद तायडे हे समाजसेवक व युवा नेता म्हणून प्रभागात ओळखले जातात. गेल्या काही वर्षांत स्थानिक समस्यांवर थेट आवाज उठवणे, नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग यामुळे प्रभागात त्यांचा दांडगा संपर्क झाला आहे.

अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना तायडे म्हणाले, “जनतेच्या मूलभूत समस्यांना प्राधान्य देऊन काम करणे हीच आमच्या कामकाजाची दिशा असेल. पाणी, रस्ते, स्वच्छता यांसह नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही लढत राहू.”

तायडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 12-अ मध्ये चुरस वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून, युवा मतदारांसह नागरिकांचा पाठिंबा कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours