जामनेर (प्रतिनिधी) — जामनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12-ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी जया अरविंद तायडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या प्रभागातील लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
जया तायडे या शिक्षित व पदवीधर उमेदवार असून त्यांचा भविष्यातील दृष्टिकोन प्रभागाच्या विकासासाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे, असा पक्षाचा विश्वास आहे. शिक्षणामुळे स्थानिक समस्यांचे विश्लेषण, नियोजन आणि निर्णयप्रक्रियेत सकारात्मक व सक्षम भूमिका पार पाडण्यास त्या सक्षम ठरणार आहेत.
याशिवाय जया तायडे यांचा महिलांमध्ये मोठा जनसंपर्क असून, समाजकार्यातील सक्रिय सहभाग, साधेपणा आणि सुलभ स्वभावामुळे त्या प्रभागातील महिला मतदारांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
त्यांचे पती अरविंद शांताराम तायडे हे प्रभागातील प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात असून, नागरिकांच्या समस्या सोडवणे, सामाजिक उपक्रम राबवणे आणि विकासासाठी सातत्याने धडपड करणारे नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. आता त्यांचा राजकीय वारसा जया तायडे पुढे नेणार आहेत.
तायडे कुटुंबाचा सर्वसामान्यांशी दांडगा संपर्क असल्याने, त्यांच्या उमेदवारीची चर्चा प्रभागात जोरात सुरू आहे. पक्ष कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, प्रभाग क्रमांक 12-ब मधील ही निवडणूक तायडे कुटुंबाच्या मजबूत जनाधारामुळे चुरशीची ठरणार, असे राजकीय वर्तुळाचे मत आहे.
+ There are no comments
Add yours