जामनेर: वार्ड १२ मध्ये चतुष्कोणी लढत : भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने

जामनेर नगर परिषद निवडणूक : वार्ड १२ मध्ये भाजपची जोडी मैदानात, राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने

जामनेर नगर परिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक 12 मध्ये चुरस वाढली असून भाजपकडून सुहास पाटील आणि नीलिमा राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुहास पाटील यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली असून त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला आहे.

तर नीलिमा राहुल पाटील या नवख्या चेहऱ्याला पहिल्यांदाच संधी देत गिरीश महाजन यांनी तिकीट दिलं आहे. नव्या उमेदवारामुळे या वार्डात भाजपकडून ताजेपणा आणि आक्रमकता दिसेल, अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.

जामनेर निवडणुकीत वार्ड १२ वर सर्वांचे लक्ष : कोण जिंकणार प्रतिष्ठेची लढत?

भाजपच्या या जोडीसमोर राष्ट्रवादीतही गटबाजी स्पष्टपणे जाणवते. शरद पवार गटातून उत्तमराव पाटील तर अजित पवार गटातून जया अरविंद तायडे रिंगणात आहेत. दोन्ही गटांकडून हा वार्ड प्रतिष्ठेचा मानला जात असल्याने त्यांच्यातही जोरदार लढत अपेक्षित आहे.

सुहास पाटील–नीलिमा पाटील विरुद्ध उत्तमराव पाटील–जया तायडे अशी चतुष्कोणी लढत रंगण्याची चिन्हे असून वार्ड 12 मधून कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours