लोकनियुक्त कारभाराला ब्रेक; जामनेरमधील ७४ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती होणार!

जामनेर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या हाती!

११ ते २६ फेब्रुवारीदरम्यान प्रशासकांची नियुक्ती

जामनेर तालुक्यातील एकूण ७४ ग्रामपंचायतींचा विद्यमान कार्यकाळ संपुष्टात येत असून, येत्या ११ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध ग्रामपंचायतींची मुदत समाप्त होणार आहे. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींचा कारभार तात्पुरता प्रशासकांच्या हातात जाणार आहे.

याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही सुरू केली असून, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रशासकांमध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.

नवीन लोकनियुक्त ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत संबंधित गावांमधील दैनंदिन प्रशासकीय कामकाज, विकासकामे तसेच विविध शासकीय योजना राबविण्याची संपूर्ण जबाबदारी या प्रशासकांकडे असणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता प्रशासकीय पातळीवर बदल होणार असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातून जवळपास 74 ग्रामपंचायतचा कारभार येत्या 26 फेब्रुवारी पर्यंत संपुष्टात येणार असल्याने प्रशासनाकडून प्रशासक नेमण्यात येणार आहे आणि त्यासाठी प्रक्रिया सुरू असून जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पत्र व्यवहार सुरू आहे अशी माहिती बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांनी दिली आहे

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours