जामनेर तालुक्यातील पाळधी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगावहून संभाजीनगरकडे जाणारे चारचाकी वाहन नियंत्रण सुटून थेट रस्त्याकडेला असलेल्या चहाच्या टपरीत घुसले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दुसऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पाळधी परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यामुळे वारंवार अपघात होत असल्याची स्थानिकांची ओरड आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
+ There are no comments
Add yours