जामनेर | जामनेर महाविद्यालयातील कला शाखेचे समन्वयक प्रा. डॉ. विजयेंद्र विश्वनाथ पाटील यांना महाविद्यालयात आयोजित आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेळोवेळी राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल नगराध्यक्षा मा. सौ. साधनाताई गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरीय विद्यार्थी चर्चासत्राचे औचित्य साधून दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. जितेंद्रभाऊ बाबुराव पाटील, सचिव मा. श्री. जितेंद्रभाऊ रमेश पाटील, जी. एम. फाउंडेशन जामनेरचे अध्यक्ष श्री. शिवाजी नाना सोनार उपस्थित होते.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र खडायते, उपप्राचार्य प्रा. डी. एस. पाटील व सहकारी प्राध्यापकांनीही प्रा. डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. विजयेंद्र पाटील यांनी भविष्यात जामनेर महाविद्यालयासाठी अधिक जबाबदारीने, तत्परतेने व जोमाने कार्य करण्याची ग्वाही दिली.
+ There are no comments
Add yours