जळगाव : एकनाथ खडसेंवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौण खनिज चोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी ते पोलीस ठाण्यात गेले असताना पोलिसांना जाब विचारताना अर्वाच्य शब्दात अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 296 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी संबंधित आरोपांचे खंडन केले आहे. गौण खनिज प्रकरणात माहिती घेण्यासाठी सावदा पोलीस ठाण्यात गेलो होतो. संभाषणादरम्यान माझ्याकडून एक चुकीचा शब्द निघाला, त्याबद्दल मी पोलीस निरीक्षकांची माफी मागितली, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाबाबत त्यांची अधिकृत सविस्तर प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours