- १५ फेब्रुवारीला शिवनेरी पायथ्यास महोत्सव
- केनियातील धावपटूंचा संघ सहभागी
जुन्नर : शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन, मोरडे फूड्स व पोल्ट्री ब्रिडर्स कोआॅर्डिनेशन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील शिवनेरी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवनेरी मॅरेथॉनचे हे चौथे वर्षे असून, ५, १० व २१.१ किलोमीटर या तीन गटात देश विदेशातील तीन हजारांहून अधिक धावपटू धावणार आहेत. केनियाच्या धावपटुचा संघ हे या मॅरेथॉन चे प्रमुख आकर्षण असणार असल्याची माहिती शिवनेरी ट्रेकर्सचे अध्यक्ष निलेश खोकराळे यांनी दिली.
शिवनेरी ट्रेकर्स मार्फत दर वर्षी शिवजयंतीच्या आदल्या रविवारी शिवनेरी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदा मोरडे फूड्स, वेकिज, शिवाई देवी मंदिर ट्रस्ट, कुसूर, वडज, पारुंडे व काटेडे ग्रामपंचायतीसह उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध संस्था व संघटनाचा या उपक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग आहे. आरोग्य विभाग, वन विभाग, तहसीलदार, पोलिस दल, जुन्नर पंचायत समिती व जुन्नर नगर परिषद यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
येत्या 15 फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजता धावपटू शिवनेरी पायथ्यास दाखल होण्यास सुरवात होईल. त्यानंतर झुंबा, पारंपरिक ढोल व झांज वादन होईल. बरोबर ६.१५ वाजता धावपटूंना भगवा झेंडा (फ्लॅग ऑफ) दाखवला जाईल. लोकनेते, वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकारी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू, धावपटू या वेळी उपस्थित राहून स्पर्धेत धावणार आहेत.
धावण्याचा मार्ग
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला मॅरेथॉनचा आरंभ होईल. त्यानंतर कुसूर- तलाखी- वडज- पारुडे- काटेडे असा स्पर्धेचा मार्ग आहे. सर्व गटांच्या शर्यतींचा आरंभ व शेवट शिवनेरी किल्ला पायथ्याला कुसूर दत्त मंदिरासमोरील मैदानात होणार आहे. शिवरायांचे बालपण ज्या भागात गेले, त्या परिसरातील सर्व वैशिष्ट्ये या स्पर्धा मार्गावर धावपटूंना अनुभवता येतील. धावण्यास उत्तम अशा अत्यंत आल्हाददायक हवामानात विविधतेने नटलेल्या डोंगररांगा, शेती, जलसंपदा, वनसंपदा या सर्वांचा रोमहर्षक आनंद व अनुभव घेण्याची संधी धावपटूंना मिळणार आहे.
धावपटूंसाठी दिलेल्या सुविधा
+ There are no comments
Add yours