जामनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण; संघटन बळकट करण्याचा निर्धार

Jamner : पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत जामनेर शहर मंडळ भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी सिद्धगड भवानी मंदिर येथे प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रशिक्षण सत्रात कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्याचे मार्ग, पक्षाची विचारधारा तसेच समाजाशी प्रभावी संवाद कसा साधावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत पक्षाचे कार्य अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यात आले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

दरम्यान, या प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours