भुसावळमध्ये २० मार्च रोजी ‘अनंतकोटी’ नाट्यप्रयोग; वसतिगृह उभारणीसाठी निधी संकलनाचा उपक्रम

Bhusawal (प्रतिनिधी) : श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे ‘अनंतकोटी’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा नाट्यप्रयोग यावल रोडवरील साईजीवन शॉपीमागील सप्तशृंगी माता मंदिर रंगमंच, के. नारखेडे शाळेजवळ, तापीनगर येथे सादर होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना नाशिक येथे शिक्षणासाठी आल्यानंतर राहण्याची अडचण भेडसावत असल्याने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी फाऊंडेशनतर्फे वसतिगृह उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी त्र्यंबकेश्वर रोडवरील बेळगाव ढगा परिसरात सुमारे ३ हजार चौरस फुट जागा खरेदी करण्यात आली असून, त्या ठिकाणी भव्य वसतिगृह उभारण्यासाठी निधी संकलनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर ‘अनंतकोटी’ या नाट्यप्रयोगातून निधी उभारणी केली जाणार आहे. स्वामीचरित्रावर आधारित हा दर्जेदार नाट्याविष्कार महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यात गाजला आहे. या नाटकात १५ पेक्षा अधिक कलाकारांचा सहभाग असून श्री स्वामी समर्थ यांच्या भूमिकेत दशरथ निकम रसिकांना मंत्रमुग्ध करतात. हे नाटक राजन शंकर कोठारकर यांनी लिहिले व दिग्दर्शित केले असून संगीत साथ मधु रेडकर यांची आहे.

या उपक्रमासाठी तेजोदीप नवविचार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष Rajesh Nehete आणि प्रभारी अध्यक्ष Sandeep Rane यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

नाट्यप्रयोगासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिकीट खरेदीद्वारे या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. तिकीट बुकिंगसाठी संपर्क क्रमांक : ९९२२९०४११८.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours