जामनेर :
जामनेर शहरात माजी उपनगराध्यक्ष यांच्या मुलाच्या घरात दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी बेस्ट बाजार जवळील नवकार प्लाझा येथे ही चोरी झाली असून 6 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज जामनेर मधील नवकार प्लाझा येथील माजी उपनगरध्यक्ष श्रीराम महाजन यांचे लहान चिरंजीव किरण श्रीराम महाजन यांच्या घरात चोरी झाली. किरण महाजन हे आपल्या पत्नीसह सकाळी शाळेवर नोकरीसाठी गेले होते. सकाळी 9 ते 10 दरम्यान चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला . त्यानंतर घरातील कपाटातून चोरट्यांनी रोख रक्कम आणि 50 ग्रॅम सोन चोरून फरार झाले. महत्वाची बाब म्हणजे चोरट्यांनी बिल्डिंग परिसरातील सीसीटीव्ही तोडल्यानंतर ही धाडसी चोरी केली आहे. शिक्षक किरण महाजन हे घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना चोरीची माहिती दिली. माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले,त्याचबरोबर फिंगरप्रिंट पथक , डॉग स्कोड पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. जामनेर पोलीसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
घरात चोरीला गेलेले रक्कम ही दोन दिवसांपूर्वीच बँकेतून काढून आणण्यात आली होती. त्यामुळे कोणीतरी लक्ष ठेवून ही चोरी केली का असा संशय पोलिसांना येत आहे. जामनेर शहरात दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
+ There are no comments
Add yours