दुदैवी घटना: स्विमिंग पुलात बुडून पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू

जामनेर शहरातून एक दुदैवी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध सोनबर्डी येथील स्विमिंग पुलाच्या पाण्यात एका पंधरा वर्षे मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळतात जामनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील प्रसिद्ध सोनबर्डी येथे फिरण्यासाठी गेला होता. तिथेच स्विमिंग पूल बघण्यासाठी संकेत पाटील हा आपल्या मित्रांसमवेत आला होता. मात्र अचानक त्याचा पाण्यात तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. संकेत बोलायची माहिती तात्काळ स्थानिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर लागलीच त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

संकेत निवृत्ती गव्हांडे (पाटील) 15 वर्ष राहणार घोसला,त.सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर, हल्ली राहणार हिवरेखेडा रोड, ता.जामनेर असं मयत मुलाचे नाव आहे.

जि एम फाऊंडेशन च्या रुग्णवाहिकेवरील  चालक जालमसिंग राजपूत आणि अजून एक तरुणाने संकेतला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र काही वेळा नंतर संकेतचा मृतदेह मिळून आला.

संकेत पाटील हा जामनेर येथील शाळेत आठवी मध्ये शिकत होता. आज तो फिरण्यासाठी सोनबर्डी येथे मित्रांसोबत गेला होता. मात्र या दरम्यानच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र शुक्रा पसरली आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours