चिंचवडगावातील आलमगीर शाही मस्जिदला भाऊसाहेब भोईर यांनी दिली भेट 

भाऊसाहेब भोईर यांनी घेतली आलमगीर शाही मस्जिद येथील मुस्लिम समाजाची भेट

चिंचवड प्रतिनिधी – दि. ८ – चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज चिंचवड येथील आलमगीर शाही मस्जिदला भेट देवून मुस्लिम समाजातील बांधवांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. मुस्लिम बांधवांच्या अडी – अडचणी समजून घेवून त्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेन. त्याच बरोबर वेळोवेळी मुस्लिम समाजाला मदत करण्यासाठी माझे सहकार्य असेल असे आश्वासन भाऊसाहेब भोईर यांनी दिले.

या प्रसंगी भाऊसाहेब भोईर म्हणाले की चिंचवड मतदार संघात निवासी असलेल्या मुस्लिम बांधवांचे समाजासाठी असलेले योगदान वाखणण्याजोगे आहे. हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव समाजात एकोपा जपण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. चिंचवड मतदार संघ सर्वधर्म समभाव जपत असून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. समाजात एकोपा राहण्यासाठी माझा नेहमी हाच प्रयत्न असतो.

ते पुढे म्हणाले की यंदाच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये कपाट हे चिन्ह मिळाले आहे. या निवडणुकीत कपाट चिन्ह विजयाचे प्रतीक ठरणार आहे. उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या या शहराला सांस्कृतिक नगरी ही ओळख निर्माण करुन देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजातील बांधवांनी माझ्या पाठीशी उभे रहावे. असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

रामकुमार शेडगे – जनसंपर्क मिडिया सर्व्हिसेस – 9890775696

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours