एमसीएमसी ची पूर्व परवानगी न घेता समाज माध्यमात प्रचार करणाऱ्या पाच उमेदवारांना बजावली नोटीस

जळगाव दि. 8  विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची कोणतीही परवानगी न घेता परस्पर सोशल माध्यमांवर जाहिरात प्रसारित करणाऱ्या ५ उमेदवारांना दि.८ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया,सोशल मीडिया, बल्क मेसेजस / व्हाईस मेसेजस अशा माध्यमांवर प्रचाराच्या जाहिराती प्रसारित करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची ( एमसीएमसी) परवानगी घेणे बंधनकारक आहे.
प्रसारित करावयाच्या जाहिराती प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे असे असताना काही उमेदवारांच्या जाहिराती समाज माध्यमांवरून परस्पर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्ह्यातील ५ उमेदवाराना नोटीस बजावण्यात आली आहे.
उमेदवारांना सोशल माध्यमावर प्रचाराच्या जाहिराती प्रकाशित करावयाच्या असतील त्यांनी
जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची परवानगी घेऊनच जाहिराती प्रसारित कराव्यात असे आवाहन जिल्हा माध्यम कक्षा कडून करण्यात आले आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours