आमगांव-देवरी भाजपा उम्मीदवार संजय पुराम इनके प्रचार हेतु देवरी, गोंदिया में भाजपा जाहीर सभा
काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवताण!
आमगाव-देवरी भाजपा उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ देवरी, गोंदिया येथे आयोजित भाजपा जाहीर सभेत उपस्थित होतो. यावेळी विराट संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
पुन्हा एकदा आमगाव-देवरी मतदारसंघामध्ये संजय पुराम यांच्याकरता आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. आपल्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो तेव्हा या भागाचा सातत्याने विकास आपल्या सरकारने केला. आमदार नसतानाही संजय पुराम यांनी या भागाच्या विकासासाठी अनेक कामे आपल्या सरकारकडून मंजूर करुन घेतली.
काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवताण आहे. मविआच्या लबाड सरकारने धानाला बोनस जाहीर केले मात्र जाहीर केलेले बोनस कधीच दिले नाही. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर आपल्या सरकारने ₹15 हजार बोनस दिले, त्यापुढील वर्षी ₹20 हजार बोनस म्हणून दिले. पुन्हा आपले सरकार आल्यानंतर धानासाठी ₹25 हजार बोनस देणार आहोत, तसेच शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. यावेळी केंद्रातील मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने व महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांचा सविस्तरपणे आढावा घेतला.
आदिवासी समाजाकरिता भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आपल्या सरकारने हाती घेतली. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी गावांचा, वस्त्यांचा समग्र विकास होत आहे. महायुती सरकारने महिला, युवा वर्ग आणि विविध समाज घटकांच्या कल्याणाकरिता आणलेल्या योजनांची माहितीही याप्रसंगी दिली.
यावेळी मध्य प्रदेशचे माजी मंत्री नरोत्तम मिश्राजी, आ. परिणय फुके व इतर मान्यवर उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours