माळपिंप्री : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) रब्बी २०२५–२६ साठी अंतिम वर्षाचे कृषी विद्यार्थी माळपिंप्री येथे दाखल झाले आहेत. पुढील दहा आठवडे हे कृषीदूत गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. पाटील व विषयतज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली कृषीदूत प्रवीण बोपूडी, पवन बुवा, सुशांत जाधव, सौरभ पाटील व संग्राम पवार कार्यरत आहेत.

या उपक्रमात माती व पाणी परीक्षण, काटेकोर पाणी व्यवस्थापन, विविध पिकांची लागवड, हायटेक शेती, आंतरपीक व सापळा पीक, कीड-रोग व्यवस्थापन, मित्र व शत्रू किडींची ओळख तसेच आर्थिक नुकसानीची पातळी याबाबत माहिती दिली जाणार आहे. याशिवाय अल्पखर्चात जीवामृत, दशपर्णी अर्क व गांडूळ खत तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखवले जाणार आहे.
माळपिंप्रीच्या सरपंच सौ. सुनीता ज्ञानेश्वर पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी कृषीदूतांचे स्वागत केले. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours