मेणगाव ग्रामपंचायतची माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ!

जामनेर तालुक्यातील मेणगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या प्रथम अपील निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचा प्रकार घडलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार सागर लव्हाळे यांनी दिनांक १४/१२/२०१४ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ अन्वये अर्ज करून माहिती मागितली होती.
सदर माहिती मध्ये त्यांनी ग्रामपंचायतीचे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चाबाबत सविस्तर माहिती मागितली होती. तसेच दुसऱ्या अर्जात ग्रामपंचायतीने जे जीवन मिशन योजना तिसऱ्या अर्जात गावामध्ये केलेल्या विकास कामाची यादी तर चौथ्या अर्जात बँक खात्याबाबत माहिती मागितली होती. परंतु ग्रामसेवक यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 कायद्याचा 30 दिवसांमध्ये अर्जदार यांना माहिती दिली नाही त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार सागर लव्हाळे यांनी जामनेर येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा प्रथम अपील अधिकारी जामनेर यांच्याकडे दिनांक १३/०१/२०२५ रोजी प्रथम अपील अर्ज दाखल केला त्यावर त्यांनी दिनांक ३०-०१-२०२५ रोजी प्रथम अपील सुनावणी घेण्यात आली होती.सदर सुनावणीस ग्रामसेवक अनुपस्थित असल्याचे देखील अर्जदार यांनी सांगितले आहे.

प्रथम आपिल अधिकारी यांनी ग्रामसेवकास ७ दिवसांमध्ये माहिती विनामूल्य पुरविण्याचे लेखी आदेशित केलेले आहे. तरी ५ महिने होऊन देखील अद्याप अर्जदारास कोणतीच माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात गोंधळ तर नाही असा प्रश्न समस्त मेणगावच्या ग्रामस्थांना पडला आहे.
सदर माहिती न दिल्याने मेणगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर मात्र संशय निर्माण होत आहे. माहिती न मिळाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार लव्हाळे यांनी गटविकास अधिकारी जामनेर व जिल्हा परिषद मुख्याधिकारी जळगाव यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे.व राज्य माहिती आयुक्त नाशिक यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केलेले आहे.
विस्तार अधिकाऱ्यांनी आदेशित करून देखील माहिती दिली नसल्याने माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि विस्तार अधिकारी प्रथम अपील अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असेच म्हणावे लागेल.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours