शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या जामनेर शहरातून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका खाजगी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिकेवर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भूषण शहादु चव्हाण वय 33 वर्ष राहणार यावल जिल्हा जळगाव यांनी लग्न पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर मधील जैन इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत फिर्यादी भूषण शहादु चव्हाण हे 13 एप्रिल 2025 पासून नोकरीला लागले होते. शिक्षकाच्या नोकरीसाठी भूषण चव्हाण आणि जैन इंटरनॅशनल शाळेत यांच्यात एक वर्षाचा करार झाला होता.
मात्र जून महिना उलटून गेल्यानंतर देखील त्यांचा करार त्यांना मिळालेला नव्हता, त्यामुळे त्यांची जॉइनिंग रखडली होती. 27 जून 2025 रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास भूषण चव्हाण हे जैन इंटरनॅशनल स्कूल जामनेर येथील प्रिन्सिपल एफ ए खान यांना भेटण्यास त्यांच्या केबिनमध्ये गेले. आपल्याला अद्याप करारनामा मिळालेला नाही त्यामुळे करारनामा द्यावा अशी विनंती चव्हाण यांनी प्रिन्सिपल मॅडम कडे केली. मात्र प्रिन्सिपलएफ ए खान यांनी शिक्षक भूषण चव्हाण यांना जातीवाचक उद्धट बोलून त्यांचा अपमान केला. खालच्या जातीचे असून तुम्हाला या शाळेत नोकरी मिळणार नाही असं सांगून या शाळेत परत दिसल्यास तुम्हाला बघून घेईल अशी धमकी देण्यात आली. यानंतर भूषण चव्हाण यांनी जामनेर पोलीस स्टेशन गाठ प्रिन्सिपल एफ एक खान यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात खाजगी शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.
भूषण चव्हाण यांचा असा आरोप आहे की, जातीवाचक शिवीगाळ केल्यानंतर प्रिन्सिपल एक ए खान यांनी शाळेत आणि चव्हाण यांच्यात झालेला करारनामा त्यांच्यासमोर फाडून फेकला. सोबतच भुषण यांचे इतर महत्त्वाचे कागदपत्र येथून घेऊन जा अन्यथा ते देखील काढून टाकू असं सांगण्यात आलं होत.
भूषण महादू चव्हाण हे यावल येथे खाजगी शिकवण्या घेत होते. मात्र त्यांना नोकरी मिळाल्यानंतर ते खाजगी शिकवणे बंद करून जामनेर येथील शाळेत रुजू झाले. हातातून दिले अशी भूषण चव्हाण यांची परिस्थिती आहे.
+ There are no comments
Add yours