जामनेर
काही दिवसांपूर्वी जामनेरचे पापड उद्योजक प्रफुल्ल नहाटा यांना स्थानिक गुंडांकडून धमकी आणि मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात जामनेर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले, मात्र या सगळ्या मागील खरा सूत्रधार अद्याप फरार आहे. त्यामुळे फरार आरोपीला पकडण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची चर्चा सध्या जामनेर शहरात सुरू आहे.
नेमक मारहाण प्रकरण काय?
६ जून 2025 रोजी शहरातील पापड उद्योजक प्रफुल नाहाटा हे आपल्या घरी होते. मात्र दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान अचानक जुन्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून भाई
गिरी करत त्यांना धमकी देत मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्याकडील रोख रक्कम देखील लुटण्यात आली. या घटनेचा थरार घरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला,याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली. संशयित आरोपी जीवन सपकाळ, शरद माळी, शुभम खाटिक आणि भैया वाघ यांनी मारहाण केल्याचं निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ चौघांना अटक देखील केली. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर तीन आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली असून त्यांना जळगाव सबजेलमध्ये हलवण्यात आले आहे.
खरा मास्टरमाईंड अद्याप फरार कसा?
प्रफुल नाहाटा यांना झालेल्या मारहाणीच्या मागे जामनेर शहरातील एक उद्योजक आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘राजू कावडिया’ याचे नाव समोर आले. पोलिसांनी तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून असे स्पष्ट केले की, संशयित राजू कावडिया यांनीच या गुन्ह्यासाठी आरोपींना प्रवृत्त केले होते. सोबतच प्रफुल नाहाटा यांनी देखील मारहाणीमागे त्यांचाच हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुन्हा घडल्यापासून संशयीत राजू कावडिया पसार आहे. सोबतच तपासातून छोटू उर्फ माया बोरसे,व महाले हे देखील निष्पन्न झाले आहे. हे दोघे देखील पसार असून संशयित राजू कावडिया सह त्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत.
संशयित राजू कावडिया आहे गेल्या 26 दिवसांपासून फरार असून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. संशयित राजू कावडिया सध्या मुंबईत असल्याची शहरामध्ये चर्चा आहे. त्याचबरोबर ते अटक पूर्व जामिनीसाठी प्रयत्न करत असल्याचे देखील म्हटले जात आहे. मात्र इतक सगळ होऊन ही जामनेर पोलिसांच्या हाती संशयित राजू कावडिया , आणि इतर संशयित दोघे कसे सापडत नाही. किंवा संशयित राजू कावडिया यांना कुणाचा राजकीय अभय असून पोलीस यंत्रणाच त्यांना जमिनीसाठी वेळ देत आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व संशयास्पद कारभारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
एखाद्या सामान्य व्यक्तीने छोटा मोठा गंभीर गुन्हा केला तर त्याला तात्काळ शोधून अटक केली जाते. त्याच्या शोधात स्थानिक गुन्हे शोध पथक, त्याचबरोबर इतर पथक लावून तत्परता दाखविली जाते. पण अशीच तत्परता प्रफुल्ल नाहटा मारहाण प्रकरणातील मास्टर माईंड असलेले शहरातील प्रस्थापित उद्योजकाला पकडण्यात पोलीस का दाखवत नाही, संशयित आरोपींना पकडण्यात जामनेर पोलीस अपयशी ठरत असल्याची सध्या शहरभर चर्चा सुरू आहे.
जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुलीवर कासार यांनी सांगितले की, फरार आरोपीचा शोध सुरू असून त्यांच्या मागावर पोलिसांचे पथक कार्यरत आहे. लवकरच फरार आरोपीला ताब्यात घेतले जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. उद्या या प्रकरणी जामनेर न्यायालयात सुनावणी आहे असं मुरलीधर कासार यांनी सांगितले आहे.
+ There are no comments
Add yours