जामनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबर्डी परिसराच्या निर्जन स्थळी माजी सभापतीच्या पतीने झाडाला गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना साधारण सात वाजेच्या सुमारास घडली असून मयत व्यक्तीच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
प्रल्हाद पाटील वय 62 राहणार मोयखेडा तालुका जामनेर असं माहीत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोयखेडा येथे राहणारे प्रल्हाद पाटील यांनी आज संध्याकाळी सोनबर्डी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या निर्जन स्थळी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. प्रल्हाद पाटील हे माजी सभापती सुनंदाबाई पाटील यांचे पती आहेत. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णाला पाठवण्यात आला आहे. प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या का केली हे अद्याप गुलदस्त्यात आहे . जामनेर पोलीस पुढील तपास करीत आहे.
प्रल्हाद पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते. त्यांनी २०२१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या पत्नी मा. सुनंदा पाटील या त्याच सुमारास जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.
प्रल्हाद पाटील यांच्यावर २३ जुलै २०२५ रोजी सकाळी त्यांच्या मूळगाव महुखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मयत प्रल्हाद पाटील यांच्या खिशात काही चिठ्ठ्या मिळून आल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र या चिठ्ठीमध्ये काय लिहिले आहे हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही.
+ There are no comments
Add yours