मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यात सोशल मीडियावर रंगला “वॉर”

जामनेर 

लैंगिक छळ प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल्ल लोढा यांच्या बद्दल सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रफुल्ल लोढा यांचे भाजप सह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे खडसे यांच्यात देखील एका फोटोवरून चांगलाच वाद सुरू आहे. दोघं बड्या नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले आहे.

गिरीश महाजन यांनी आज आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एकनाथ खडसे आणि प्रफुल्ल लोढ यांचा एक फोटो शेअर केला आणि त्यात त्यांनी सांगितलं की, एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय…हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ? 

हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे… 

२०१९ ते २०२२ च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच…   

आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय ? एकनाथ खडसे… काय तुझी हि व्यथा…!

याच फोटोवर आता आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की,

गिरीश महाजन…आज सकाळी तुम्ही हा फोटो फेसबुक वर व्हायरल केला आहे…

होय,.. या फोटोमध्ये गाडीत मीच बसलोय, आणि लोढाच मला रस्त्यात फुले देऊन माझे स्वागत करतोय. कारण तेव्हा लोढा मला तुमच्या करनाम्यांची सीडी देणार होता. त्यामुळे पुढे तुम्ही उघडे पडणार होता. 

यातील धोका ओळखूनच तुम्ही लोढाची ट्रायडेन्ट हॉटेल मध्ये तीन महिने सेवा केली, त्याची मनधरणी केली आणि त्याला पुन्हा पक्षात घेतले. 

राहीले माझ्या मुलाच्या मृत्यूबाबत ? जर तुमच्यात ‘हिम्मत’ असेल, तुमची दिल्लीत ‘पत’ असेल तर, सरळ सी.बी.आय. चौकशी होऊन जाऊ द्या.. दूध का दूध व पानी का पानी दिसेल, हे ओपन चॅलेंज आहे तुम्हाला.

बी.एच.आर. मध्ये जर ठेवी पावत्यांचे सेटलमेंट करुन कर्ज भरणारे दोषी असतील तर, रकमेच्या बदल्यात ७० टक्के ठेवींच्या पावत्या जमा करुन लिलावात कवडीमोल भावाने प्रॉपर्टी घेणारेही तितकेच दोषी नाहीत का?

जळगाव जिल्ह्याच्या या दोघे बड्या नेत्यांनी सोशल मीडियावर देखील आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच ठेवली आहे. लैंगिक छळ प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल्ल लोढा प्रकरणात पुढे नेमकी काय माहिती समोर येईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours