जामनेर : येथील गिताबाई दत्तात्रय महाजन कला, श्री. केशरीमल राजमल नवलखा वाणिज्य आणि मनोहरशेठ धारिवाल विज्ञान महाविद्यालय व क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चस्तर विद्या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आज दि. १० जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.
“रिसेंट ट्रेंड्स इन सायन्स, टेक्नॉलॉजी, कॉमर्स, ह्युमॅनिटीज व आंतरविद्याशाखीय अभ्यास” हा या राष्ट्रीय परिषदेचा मुख्य विषय असून देशातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेचे उद्घाटन सकाळी ठीक १० वाजता क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते होणार आहे.

या प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. एस. टी. इंगळे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य मा. राजू नन्नवरे व मा. नितीन झाल्टेजी, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. जितेंद्र बाबुराव पाटील, सचिव मा. जितेंद्र रमेश पाटील, ज्येष्ठ संचालक मा. दिलीप महाजन तसेच अधिसभा सदस्य मा. दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
परिषदेत आयआयटी मुंबईचे डॉ. ऋषिकेश जोशी, साहित्यिक सुधीर पोखदे, प्रा. पंकज कोईनकर, प्रा. व्ही. व्ही. गिते, प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, प्राचार्य प्रा. डॉ. अरविंद चौधरी, प्रा. वासुदेव वले यांसह अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यानिमित्ताने पोस्टर गॅलरीचेही आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. डॉ. व्ही. व्ही. पाटील, सचिव डॉ. अक्षय घोरपडे, प्रा. डॉ. वर्षा मानवतकर, आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. अरविंद राऊत, उपप्राचार्य प्रा. डी. एस. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. खडायते यांनी दिली.
+ There are no comments
Add yours