जामनेर तालुक्यात विहिरीत बुडून एकाचा मृत्यू!

जामनेर तालुक्यातील टाकळी येथे दुर्दैवी घटना – 43 वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

जामनेर प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक गावात शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 25 रोजी  धक्कादायक घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास गावातील 43 वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निलेश मुरलीधर माळी (वय 43 रा. टाकळी बुद्रुक, जामनेर )अस मयत व्यक्तीचे नाव आहे.

काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आपल्या काही मित्रांसह गावाबाहेरील एका विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याने विहिरीत उडी घेतली असता, डोक्याला मार लागून तो बेशुद्ध झाला आणि त्याला पाण्यातून वर निघता आले नाही. अशाच त्याचा बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी हालचाल

घटनेनंतर ग्रामस्थांनी व मित्रांनी तातडीने प्रयत्न करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर त्याला तातडीने जामनेर येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.

पुढील तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours