बस आणि दुचाकीचा भीषण अपघात – एकाचा मृत्यू!

जामनेर तालुक्यातील शहापूर येथे आज संध्याकाळी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी आणि प्रवासी बस यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. घटनास्थळावर पोलीस तातडीने दाखल झाले असून मृतदेह जामनेर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या अपघाताचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours