एस.टी. बस धडकेत कंडक्टर ईश्वर कंडागळे यांचा जागीच मृत्यू
“प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवणारा सेवकच बस अपघातात मृत्युमुखी…”
जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा गावचा ३३ वर्षीय युवक ईश्वर अरुण कंडागळे, एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत, यांचा झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.
आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ हा अपघात घडला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर कंडागळे हे स्वतःच्या दुचाकीवरून शहापूरहुन शेंगोळाकडे भरधाव वेगात जात होते. अचानक नियंत्रण सुटल्याने ईश्वर यांच्या दुचाकीने एस.टी. बस (क्र. MH 20 BL 3360) जोरदार धडक दिली.धडकेचा जोर एवढा भीषण होता की ते जागीच कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यूने त्यांना कवटाळले.घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने ईश्वर खंडागळे यांना जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीचत्यांना मृत घोषित करण्यात आले.
शिर्डी जाण्यासाठी घेतली रजा
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर खंडागळे हे वाहक असून जामनेर बस स्थानक येथे कार्यरत होते. आज संध्याकाळी चार वाजता ते आपली ड्युटी संपवून बस स्थानकात आले होते. सूत्रांनी सांगितले की,ईश्वर खंडागळे हे आपल्या कुटुंबासह उद्या शिर्डीला जाणार असल्याने त्यांनी रजा घेतली होती. मात्र दुर्दैव घरी जात असताना ईश्वर खंडागळे यांचा एसटी बस सोबत अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विडंबना म्हणजे – ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सुरक्षित सेवा केली, त्यांचाच जीव एस.टी. बसच्या चाकाखाली गेला.
नागरिकांची धावपळ
अपघात होताच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तात्काळ मदत करून ईश्वर कंडागळे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
गाव शोकसागरात
ईश्वर कंडागळे यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण चिंचखेडा गावात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त करताना म्हटले –
“जे रोज प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत, सुरक्षित घरी पोहोचवत होते… त्यांचेच जीवन बसच्या चाकाखाली संपले.”
पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून बस जप्त केली असून, अपघाताबाबतचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
+ There are no comments
Add yours