जामनेर – सप्तशृंगी दुर्गा उत्सव मित्र मंडळाची नवीन पदाधिकारी निवड
जामनेर (प्रतिनिधी) : सप्तशृंगी दुर्गा उत्सव मित्र मंडळ, प्रकाश नगर – प्रेम नगर – गोविंद कॉलनी, जळगाव रोड जामनेर मंडळाची सालाबाद प्रमाणे बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत उत्सवाच्या नियोजनाबरोबरच नवीन पदाधिकारी निवड एकमताने करण्यात आली.
अध्यक्षपदी मा. श्री. जगदीश नाना सोनार यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी जयेश समाधान गवळी, खजिनदारपदी ॲड. महेंद्र पाटील व ॲड. आशुतोष, सचिवपदी ॲड. विनोद जनार्धन धनगर आणि सहसचिवपदी मनोज भाऊ महाजन यांची निवड झाली.
सल्लागारपदी गणेश भाऊ कोळी, सुदाम भाऊ पाटील, मनीष पाटील सर व भूषण भाऊ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच मंडळाचे सदस्य म्हणून अविनाश भाऊ मराठे, श्रीकांत चौधरी, दीपक फिरके, कौस्तुभ चौधरी, हर्षल पाटील, दीपक चौधरी, निलेश माळी, दिप्तेश ठाकूर, सोनू भाऊ जोशी, प्रसाद पाटील, सागर भाऊ महाजन, सुरज भाऊ सपकाळे, आकाश पाटील, नानाभाऊ काकडे, चंद्रकांत आण्णा तायडे, साई पाटील, पवन माळी, तनय सोनवणे, ऋषी शेळके, सोनू चौधरी, जयदीप चौवरे, जगदीश चौवरे, कुणाल चौवरे, राहुल माळी, केशव तेली, दादू पाटील, समर्थ ठाकूर, अजय प्रधान, रितेश लोखंडे, वेदांत पाटील यांचा समावेश आहे.
या बैठकीत मंडळाचे उर्वरित सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने झाल्याने उत्सव साजरा करण्यासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
+ There are no comments
Add yours