जामनेर ; डंपरखाली चिरडून एकाचा मृत्यू – अवैध वाळू वाहतुकीविरोधात संताप!

जामनेर :
म्हसावद-नेरी–जामनेर मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडून एका व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून, संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे.

गजानन पाटील वय 30 अस मयत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,नेरी जवळ संबंधित डंपर अवैध वाळू घेऊन जात असताना नियंत्रण सुटून पादचाऱ्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली.  घटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर मोठी गर्दी जमली आणि नागरिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल जोरदार निषेध नोंदवला.

स्थानिकांचा आरोप आहे की, डंपरमार्फत सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. तसेच अपघातानंतर पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला.

दरम्यान, मृत व्यक्तीला न्याय मिळावा, अवैध वाळू वाहतुकीवर तात्काळ आळा घालावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू असून, वातावरण तणावपूर्ण आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours