पाचोरा (दि. ३० ऑक्टोबर) – पाचोरा व भडगाव तालुक्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक तयारीसंदर्भात आज पाचोरा येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रमुख नेत्यांनी भूषविले.
बैठकीत नगरपालिकांच्या प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांचे पर्याय, पक्षाची संघटनात्मक स्थिती, निवडून येण्याची क्षमता, तसेच गट-गण निहाय रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. तालुक्यातील प्रमुख नेते, जिल्हा पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष यांच्यात समन्वय राखण्यासाठी उपाययोजना ठरविण्यात आल्या.

बैठकीत ठरविण्यात आले की, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने मैदानात उतरून पक्षाला दैदिप्यमान यश मिळवून देतील.
लवकरच मा. ना. गिरीशभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीस माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, अमोल शिंदे, वैशाली सूर्यवंशी, प्रतापनाना पाटील, संजय वाघ, मधुकर काटे, सुभाष मुंडे पाटील, सोमनाथ पाटील, डॉ. शांतीलाल तेली, गोविंद शेलार, अनिल पाटील, विनोद नेरकर, डी. डी. पाटील सर, संदीप जैन आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours