भाजप जळगाव पश्चिम जिल्ह्याची “तीर्थक्षेत्र विकास आघाडी” कार्यकारिणी जाहीर

जळगाव (दि. 30 ऑक्टोबर) – भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याची “तीर्थक्षेत्र विकास आघाडी जिल्हा कार्यकारिणी २०२५” आज औपचारिकरीत्या जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार घोषित करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीची घोषणा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि वस्त्रोद्योग मंत्री  संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

तसेच या बैठकीस प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटन मंत्री रविजी अनासपुरे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेशदादा चव्हाण आणि आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात आले.

भाजप जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार तीर्थक्षेत्र विकास आघाडी जिल्हाध्यक्षपदी सुरेश भगवान बाविस्कर यांची निवड करण्यात आली असून त्यांनी २०२५ साठीची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.

या कार्यकारिणीमुळे जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours