जामनेर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जामनेर कार्याध्यक्षपदी विकास दशरथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश कालीदास नेमाडे यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र देत अभिनंदन केले.
या नियुक्तीबाबत दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खान्देश प्रभारी तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन बळकट करण्यासाठी पाटील कार्यरत राहतील.

जामनेर शहरात पक्षाचे कार्य अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी त्यांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी विकास पाटील यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
+ There are no comments
Add yours