जळगाव शहरात भाजपला नवसंजीवनी, प्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांचा उत्साह
जळगाव – आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. शहरातील उबाठा गटाचे प्रमुख नेते आणि माजी महापौर श्री. नितीन लढ्ढा तसेच माजी महापौर श्रीमती जयश्री सुनील महाजन यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
भाजप कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षात प्रवेश करताना दोन्ही माजी महापौरांनी भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत “जळगावच्या विकासासाठी भाजपसोबत काम करणार” अशी भूमिका जाहीर केली.
या प्रवेशामुळे भाजपला शहरात संघटनात्मक बळ मिळाल्याचे मानले जात असून, आगामी निवडणुकांपूर्वी हा प्रवेश उबाठा गटासाठी मोठा राजकीय धक्का ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या “भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी” शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे नव्या घडामोडींनी अधिक रंगतदार बनली आहेत.
+ There are no comments
Add yours