ओशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोलो डान्स व ‘आई-मुल’ नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न


जामनेर प्रतिनिधी

जामनेर : दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (ICSE Pattern) येथे आज, शुक्रवार दि. 07 नोव्हेंबर 2025 रोजी सोलो डान्स (एकल नृत्य) तसेच आई आणि मुलांची नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाला शाळेच्या चेअरपर्सन सौ. लक्ष्मी वायकर मॅडम आणि मुख्याध्यापिका सौ. सीमा श्रोत्रिया मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती जोशी यांनी केले, तर स्पर्धेचे परीक्षण सौ. सुचिता सोनवणे आणि सौ. कोमल शिंदे यांनी केले.

सोलो डान्स स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून विविध गाण्यांवर अप्रतिम नृत्य सादर केले. या स्पर्धेत
🏆 प्रथम क्रमांकअधिरा भिसे,
🥈 द्वितीय क्रमांकगुजन राजपुत,
🥉 तृतीय क्रमांकहार्दिक राजपुत यांनी पटकावला.

‘आई आणि मुल’ या विशेष नृत्य स्पर्धेत सहभागी जोड्यांनी आपल्या समन्वय आणि भावनिक सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेत
🏆 प्रथम क्रमांकरियांश पाटील आणि त्यांची आई भूमेश्वरी पाटील,
🥈 द्वितीय क्रमांकत्रिशा महाजन आणि तिची आई पौर्णिमा महाजन यांनी पटकावला.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा श्रोत्रिया मॅडम यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना कला आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत प्रगती साधण्याचे आवाहन केले.

हा उपक्रम शाळेत उत्साह, आनंद आणि सर्जनशीलतेचे वातावरण निर्माण करणारा ठरला.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours