जामनेर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा मोर्चा सज्ज — विरोधक अजूनही तयारीत मागे

जामनेर नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू — भाजपला ‘27-झिरो’ विजयाचा आत्मविश्वास, विरोधक मात्र सोशल मीडियापुरतेच मर्यादित
जामनेर प्रतिनिधी

जामनेर : आगामी जामनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. शहरात निवडणुकीची धामधूम सुरू असून, भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकदीनिशी तयारीला सुरुवात केली आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते शहरातील प्रत्येक प्रभागात पोहोचून जनसंपर्क साधत आहेत. पक्षाला 27-झिरो ने नगरपरिषद जिंकण्याचा आत्मविश्वास असून, त्यासाठी बैठका, नियोजन आणि संघटनात्मक रणनीतीचा धडाका सुरू आहे.

भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वजण मैदानात उतरले आहेत. मागील पाच वर्षांत झालेल्या विकासकामांचा मुद्दा भाजपने पुन्हा एकदा जनतेसमोर मांडण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रस्ते, शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रम या क्षेत्रातील यशस्वी उपक्रमांचा उल्लेख करून ‘विकासाच्या मुद्द्यावर’ मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन सुरू आहे.

दुसरीकडे, विरोधक मात्र सोशल मीडियावरच सक्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांनी अद्याप निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांबाबतही कोणतीही स्पष्टता नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, विरोधकांचा हा संथ वेग भाजपसाठी ‘सुवर्णसंधी’ ठरू शकतो. महाविकास आघाडीने अजून तयारीचा श्रीगणेशा न केल्याने, भाजपला प्रचारात आणि संघटनात्मक बळकटीत आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जामनेरमध्ये निवडणुकीच्या दिशेने राजकीय तापमान चढू लागले असून, पुढील काही दिवसांत शहरात उमेदवारी आणि प्रचार मोहिमांची रणधुमाळी रंगण्याची शक्यता आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours