जामनेर–बोदवड रस्त्यावर पुन्हा भीषण अपघात
घाटातील वळणावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक; एक गंभीर जखमी
जामनेर : जामनेर–बोदवड रस्त्यावर आज संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास भवानी मंदिर परिसरातील घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. दोन मोटारसायकलींची समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोघे जखमी झाले असून त्यापैकी युवराज प्रकाश मेतकर (मिस्तरी), राहणार शेलवड हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच आरोग्यदूत आणि रुग्णवाहिका चालक जालमसिंग राजपूत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय टीमने प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या युवराज मेतकर यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात येत आहे.
जामनेर–बोदवड मार्गावरील हा घाट परिसर सतत अपघातप्रवण ठरत असल्याने नागरिकांनी योग्य उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
+ There are no comments
Add yours