जामनेरच्या युवकाचा थंड डोक्याने खून; मैत्रीतूनच मृत्यूचा कट उघड

जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील 30 वर्षीय निलेश राजेंद्र कासार याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १५ डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या निलेशचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नेव्हरे धरणातून बाहेर काढण्यात आला. एलटीआय फायनान्स कंपनीतील कामाच्या वादातूनच हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

मित्र दिनेश चौधरी व भूषण पाटील यांनी प्रकरण मंजुरीच्या बहाण्याने निलेशला शिरसोली येथे बोलावले. जुन्या वादाची खुन्नस मनात ठेवून दोघांनी निलेशचा दोरीने गळा आवळून खून केला व मृतदेह पोत्यात टाकून धरणात फेकून दिला. एमआयडीसी पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींना पकडताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

जिल्ह्यात पुन्हा एकदा खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली असून निलेशच्या नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 निलेश राजेंद्र कासार हा तरुण दि. 15 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून जळगाव येथून बेपत्ता झाला होता. दरम्यान, जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील रामदेववाडी परिसरात निलेश कासार याची मोटारसायकल आढळून आली होती. मात्र तरुणाचा  कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. निलेश बेपत्ता झाल्यापासून त्याचा मोबाईल फोन बंद येत असून, यामुळे नातेवाईकांची चिंता अधिकच वाढली आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास सुरू होता. अशातच आज सकाळी निलेशचा मृतदेह आढळून आला. 

मोहन दुबे रिपोर्टर जळगाव 

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours