नेरी बुद्रुक जिल्हा परिषद मराठी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

नेरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये १९ फेब्रुवारी निमित्त शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषेत देखावे साकारून उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांच्या सादरीकरणातून शिवभक्ती आणि इतिहासाची जाणीव प्रभावीपणे दिसून आली.

कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर भाषणे करत प्रबोधन केले. मोहित प्रभुदास कोळी, दिव्या राजेश वाघ, लोकेश विजय खोडपे, साक्षी विजय खोडपे, संचिती धनंजय पाटील, मानसी विकास तोडकर, श्रावणी सुरडकर, ओम मनोज कुमावत आणि पवन सुधाकर कोळी या विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस शब्दांतून शिवरायांप्रती आदर व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील सर यांनी केले. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता पाटील होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी “शिवाजी महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेण्याची गरज आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन संगीता राऊत मॅडम यांनी केले.

यावेळी शिक्षणप्रेमी महेंद्र सोनार, मुख्याध्यापक तेजराव वानखेडे, शिक्षकवृंद तसेच गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शाळेच्या परिसरात देशभक्ती आणि शिवभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours