जामनेर-पाचोरा रेल्वे भूसंपादन : शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून तोडगा काढण्याचे रक्षा खडसेंचे आश्वासन

जामनेर-पाचोरा पीजे रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या

जामनेर (प्रतिनिधी) :
जामनेर-पाचोरा-बोदवड ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या आज जामनेर येथे समोर आल्या. भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत जामनेर, पहूर व बोदवड परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून “पीएम गतीशक्ती योजना” अंतर्गत तब्बल ९५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, भूसंपादन प्रक्रियेसाठी राज्य शासनाने १०० कोटींची तरतूद केली आहे. मात्र शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की, त्यांना भूसंपादन कायदा २००८ ऐवजी भूसंपादन कायदा २०१३ नुसारच मोबदला मिळावा.

बैठकीत बाधित शेतकरी व नागरिकांनी शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून न्याय्य तोडगा काढावा, अशी भूमिका मांडली. यावेळी संबंधित लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, त्यांच्या अडचणी सोडवून भूसंपादन प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण केली जाईल. तसेच पुढील ८ दिवसांत रेल्वे बोर्ड अध्यक्षांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगण्यात आले.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours