जामनेर तालुक्यातील शेंगोळे येथे सालाबादप्रमाणे यात्रा सुरू झाली आहे. मनोरंजनासाठी असणाऱ्या या यात्रेत आता मात्र सर्रास अवैध धंदे सुरू झाले आहे. यात्रेत पोलिसांच्या बंदोबस्तात अवैध धंदे तेजीने सुरू आहे. त्यामूळे येणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या या शेंगा यात्रेत लांबून नागरिक म्हणून रंजनासाठी येत असतात. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने शेंगोळा यात्रेत मोठया प्रमाणात गर्दी झालेली होती. मात्रा मनोरंजनासाठी आलेल्या यात्रेकरूंना रस्त्यावरील अवैध धंदे वाल्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पोलिसांची बघ्याची भूमिका !
शेगोळा यात्रेत जवळपास 7 ते 8 ठिकाणी सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहे. यामध्ये लहान मुलांकडून अवैध दारू विक्री केली जात आहे. तर इतर ठिकाणी क्लब, सोरट,पत्ता ,जुगार उघडपणे खेळले जात आहेत. महत्वाची बाब म्हणजे यात्रेत पोलीस बंदोबस्त कडक असूनही कुणाचीच नजर या अवैध धंद्यांवर जात नसेल का? की जाणून बुजून कानाडोळा केला जात असून पोलीस बंदोबस्तातच हे अवैध धंदे सुरू आहे की काय ? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. शहरातपण खुलेआम जुगार व दारूची विक्री होत आहे. संबधित विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
शेंगोळा यात्रेत जुगार खेळणारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या व्यवसायाची चलती आहे. तसेच,दारू व पत्ता यामुळे अनेक घरांत कलह वाढले आहेत. झटपट पैसे कमविण्याच्या हेतुने तरुण आणि प्रतिष्ठित नागरिक या व्यवसायाकडे वळले आहेत. यामध्ये रोज लाखो रुपायांची उलाढाल होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खुलेआम चालणारा अवैध पद्धतीने जुगार व्यवसाय व दारू विक्री बंद करावी, अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
यात्रेत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार का?
यात्रा-उत्सवाच्या काळात पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रा-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आली होते. माञ यात्रेत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी उच्छाद मांडला आहे. कर्कश आवाज असलेले भोंगे वाजवत आहेत. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलीस कारवाई करतील का हा देखील प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.
+ There are no comments
Add yours