तिनदा चुकीची शेत मोजणी झाल्याने महिला शेतकऱ्याने दिला 1 मे रोजी  सरकारला आत्म दहनाचा इशारा

 

जामनेर: तालुक्यातील खर्चाने गावातील एका शेतकऱ्याने आपल्या आईच्या नावावर असलेल्या शेतीची तिनदा झालेल्या चुकीच्या फेर तपासणीमुळे कंटाळून महिला शेतकऱ्याने सरकारला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सुमित्राबाई बाबुराव पाटील अस महिला शेतकऱ्याच नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, खर्चाने गावात सुमित्राबाई बाबुराव पाटील यांची काही एकर शेती आहे. त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून खर्चाने गावात वास्तव्यस आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह हा पूर्णपणे शेतीवरच आहे.   2012 मध्ये शेताची मोजणी करण्यासाठी सुमित्राबाई पाटील यांनी भूमि अभिलेख कार्यालयाकडे मागणी केली होती. या मागणीनुसार 2012 मध्ये झालेल्या शेत मोजणीनंतर शेजारील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याचा संशय सुमित्राबाई पाटील यांना होता. त्यामुळे शेत मोजणी झाल्यानंतर त्यांना त्यांची अतिक्रमण केलेली जमीन फरक मिळाली. त्यानंतर पुन्हा 2024 मध्ये शेजारील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या शेतात अतिक्रमण केल्याचा संशय आला ज्यामुळे सुमित्राबाई पाटील यांनी दुबार मोजणी करण्याची मागणी केली. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांतर्फे पाटील यांची शेतजमीन पुन्हा मोजण्यात आली. मात्र यावेळेस मोजणी केल्यानंतर 2012 मध्ये झालेल्या मोजणीच्या उलट ही मोजणी झाली आणि सुमित्राबाई पाटील यांच्या शेतीच्या खुणा शेजारच्या शेतात सरकल्या. त्यामुळे सुमित्राबाई पाटील यांनी  पुन्हा तिसऱ्यांदा फेर तपासणी करण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर देखील पुन्हा फेर तपासणी केली असता सुमित्रा बाई पाटील यांचे जवळपास अर्धा एकर शेत दुसऱ्यांच्या शेतात असल्याचा मोजणी अधिकाऱ्यांनी मोजून दिले.

सुमित्राबाई पाटील यांची शेतीची २०१२ साली सरकारी मोजणी झाली होती, तेव्हा त्यांच्या हद्दीतील हक्काची अतिक्रमण झालेली जमिन त्यांना परत मिळाली. मात्र 2024 साली परत शेजारील शेतकरी यांनी अतिक्रमण केल्या मुळे पाटील कुटुंबाने फेर मोजणी चा अर्ज केला होता. सदर मोजणी २०२४ ला परत झाली पण २०१२ ची मोजणी आणि २०२४ मोजणी या मध्ये प्रत्यक्ष जागेवर खूप जास्त प्रमाणात तफावत दिसून अली आणि कागोतपात्री दोन्ही मोजणी सारख्याच असल्यामुले प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करून वारंवार अर्ज करून देखील समाधानकारक उत्त्तर मिळाले नाही. त्यामुळे नव्याने शेत मोजणी व्हावी त्याचबरोबर ती योग्य अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात यावी अशी मागणी सावित्रीबाई बाबुराव पाटील यांनी केली आहे. शेत मोजणी योग्य पद्धतीने आणि लवकर न झाल्यास सावित्रबाई पाटील यांनी उद्या 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारला पतीसह आत्मदहनाचा इशारा दिला आहे.  तसेच माझ्या आई ला काही झाल्यास सरकार जबाबदार राहील अस दिनेश पाटील यांनी सांगितलं आहे. 

  तीनदा फेर मोजणी होऊन देखील सावित्रीबाई पाटील यांना आपली हक्काची जमीन मिळालेली नाही. उलट जवळपास अर्धा एकर शेत जमीन शेत मोजणी मध्ये सरकल्याने सावित्रीबाई पाटील यांनी उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालय जामनेर , भूमि अभिलेख कार्यालय जळगाव, भुमिअभिलेख कार्यालय नाशिक , यासह मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे. 

दिनेश पाटील यांनी सांगितले की जवळपास अर्धा एकर आमची शेती अचानक दुसऱ्याच्या शेतात कशी सरकली 2014 मधील मोजणी झालेली चुकीची कशी असा प्रश्न दिनेश पाटील आणि त्यांच्या शेतकरी कुटुंबाने  उपस्थित केला आहे. 

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours