जामनेर येथे वीज कोसळून तीन म्हशींचा मृत्यू!

जामनेर शहरात अवकाळी पावसाने तीन म्हशींचा बळी घेतला आहे. ही दुर्दैवी घटना आज रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहरातील पुरा परिसर येथे घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती अनुसार, आज रात्री नऊ वाजता अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसाने जामनेर शहराला झोडपून काढले.जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडात धुवाधार पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसाने जामनेर पुरा येथे नदीजवळ विजय परदेशी या शेतकऱ्यांचा म्हशींचा गोठा आहे. दुग्ध व्यवसायावर परदेशी कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे . मात्र आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे विजय परदेशी यांच्या पत्र्याच्या गोठ्यावर वीज कोसळली, यामुळे गोठ्यातील तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तीन म्हशींचा मृत्यू झाल्याने विजू परदेशी यांचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मोठ नुकसान झाल्याने विजू परदेशी यांना सरकारी मदत मिळेल का हा देखील मोठा प्रश्न आहे. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जावण्याचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी देखील घटनास्थळीची पाहणी केली.

2 तास जामनेर शहराची बत्ती गुल 

अवघ्या तासभर झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तासभर झालेल्या पावसामुळे जवळपास दोन तास जामनेर शहराची बत्ती गुल होती. त्यामुळे महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा दिसून आला आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours