रावेर वनपरिक्षेत्राच्या कारवाईत 5.73 लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त; मध्य प्रदेश वनविभागाच्या ताब्यात सुपूर्द

जळगाव , दि. 5 मे : रावेर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सुमारे 5.73 लाख रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई रावेर-चोरवड मार्गावर मौजे लोणी गावाजवळ करण्यात आली.

दिनांक 5 मे 2025 रोजी गस्तीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रावेर-चोरवड रस्त्यावर संशयित वाहने अडवण्यात आली. यात MH04CU5418 क्रमांकाचा आयशर ट्रक व MH19Z7862 क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आले. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता पंचरास जातीचे एकूण 31 घनमीटर लाकूड आढळून आले.

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 5,73,400 रुपये इतकी होते. सदर गुन्हा हा मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घडलेला असल्याने रावेर वनविभागाने तत्काळ मध्य प्रदेश वनविभागाशी संपर्क साधून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले.

या कारवाईत जप्त केलेली दोन्ही वाहने व लाकूडसाठा पुढील कार्यवाहीसाठी खालील मध्य प्रदेश वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले:

  1. युनुस दाऊदी, वनपाल
  2. आर. डी. काजळे, वनरक्षक
  3. वीरेंद्र कुमार, वनरक्षक

ही कारवाई नीनू सोमराज, वनसंरक्षक (प्रा.), वनवृत्त धुळे; श्री. जमीर शेख, उपवनसंरक्षक, यावल; श्री. आर. आर. सदगीर, विभागीय वन अधिकारी (दक्षता), धुळे; व श्री. समाधान पाटील, सहा. वनसंरक्षक, यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर मोहिमेत वनपाल श्री. अरविंद धोबी (सहस्त्रलिंग), वनरक्षक आयेशा पिंजारी (अहिरवाडी), सविता वाघ (पाडले खु.), जगदीश जगदाळे (जुनोना), वनमजूर सुभाष माळी आणि वाहनचालक विनोद पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours